चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्या या पूर्ववत चालु करा…
हेरा (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय तसेच इतर आस्थापने ही पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत, असे असताना चंदगड आगारकडून पूर्वीप्रमाणे चालू असलेल्या एस.टी. (बस) फेर्या अद्यापही पूर्ववत केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिक यांची गैरसोय होत अजून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अश्या या गंभीर समस्यावर युवासेनेच्या पदाधिकार्यांनी निर्णय घेत आगार व्यवस्थापनाला भेट दिली.
’चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्या या पूर्ववत चालु करा’ या मागणीचे निवेदन युवासेना चंदगड तालुक्याच्या वतीने चंदगड आगार व्यवस्थापनाला देण्यात आले. यावेळी युवासेना तालुका अधिकारी विक्रम मुतकेकर, युवासेना तालुका समन्वयक शरद गावडे, युवासेना शहर अधिकारी सकलेन नाईक यांच्यासह युवासैनिक व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …