१ कोटी १० लाखांच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे. आमदार हा एखाद्या गटाचा, गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे. निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल, असे विचार आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
किणी -कर्यात (ता. चंदगड) भागातील विविध गावामध्ये १ कोटी १० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी होसूर येथे आयोजित कार्यकमात आमदार पाटील बोलत होते. कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजाराम नाईक होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य अरूण सुतार होते.
यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या व फंडातून जि. प. सदस्य अरूण सुतार यांच्या फंडातून अंतर्गत रस्ता ५ लाख, काँक्रीटीकरण २ लाख, ग्रामपंचायत बांधकाम २० लाख, मराठी शाळा बांधकाम २७.५० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच राजाराम नाईक, उपसरपंच सौ. छाया पाटील, एस. एल. पाटील, लक्ष्मण राजगोळकर, एस. वाय. पाटील, हणमंत पाटील, मारूती राजगोळकर, मा. सरपंच पांडूरंग सुतार, ज्ञानेश्वर नाईक, परशराम पाटील, पोमाणी पाटील, दत्तात्रय पाटील, सुर्यकांत पाटील, विष्णू आढाव आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन बी. बी. नाईक यांनी केले.
१ कोटी १o लाखांच्या कामांचे लोकार्पण व उद्घाटन
आज आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होसूर, कौलगे, बुक्याळ, कल्याणपूर, कागणी, किणी, नागरदळे आदी गावामध्ये १ कोटी १० लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta