
शिनोळी : श्री क्षेत्र वैजनाथ देवरवाडी ता.चंदगड येथील देवालयाची पाहणी व आवश्यक सूचना करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव तथा धर्मादाय आयुक्त अधीक्षक शिवराज नाईकवाडेसो यांनी शुक्रवार दि. १८/३/२०२२ रोजी दुपारी भेट दिली. यावेळी वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवरवाडी ग्रामपंचायत यांच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. देवरवाडीच्या उच्चविद्याविभूषित महिला सरपंच गीतांजली सुतार व उपसरपंच गोविंद आडाव यांच्याकडून मा. सचिव सो, सोबत पदाधिकारी, सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानाबाबतच्या पुढील नियोजित विविध विकास कामाबाबत चर्चा झाली. तसेच देवालयातील सर्व पुजारी वर्गाच्या अडचणीबाबत चर्चा झाली. यावेळी देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, प्रा.डॉ. नागेंद्र जाधव, शंकर वैजू भोगण, राजू करडे, ह भ.प. संजय भोगण, शिवकुमार पुजारी, विष्णू कवडेर, शंकर गोपाळ भोगण, दशरथ कृष्णा भोगण व गावातील पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta