
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बालपणापासून संगीत क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेल्या समृद्ध राजाराम कांबळे (मूळगाव कोरज, ता. चंदगड) सद्या राहणार नेसरी याचा सत्कार चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगडी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर सन्मान संगीत कार्यातील योगदानाबद्दल आहे. प्रा. परसू गावडे यांनी दिग्दर्शित केलेल्या “पॉज” या एकांकिकेला समृद्धने संगीत दिलेले आहे. तो गेली चौदा वर्ष मच्छिन्द्र बुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे.
चंदगडसारख्या दुर्गम भागात राहून संगीत सिनेसृष्टीत संगीत आणि गायन करणारा हा नवोदित संगीतकार आहे. समृद्धने अनेक वेबसिरीज, नाटक, अल्बम, मालिकासाठी संगीत, गायन केले आहे. त्याने केलेले “कैशी हे आझादी” हे एक हिंदी गीत हे जपानमध्ये नामाकणं झालेले असून ते गीत जपानमध्ये छायाचित्रण केलेले आहे. यापूर्वी समृद्धने दुबई येथील सांस्कृतिक महोत्सवात शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्याचा ‘हर एक तारा’ नावाचा अल्बम संगीतबद्ध आणि गीत गायन केला आहे.
सद्या तो मुबंई विद्यापीठात बी. म्युझिकच्या संगीत पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून त्याच्या या कार्याबद्दल चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी विशेष कौतुक केले. यावेळी कार्वेचे सरपंच शिवाजी तुपारे, हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. पाटील, उपसरपंच डॉ. नंदकुमार मोरे, संतोष वेरूळकर, मराठीतील बारोमांस नाटकाचे दिग्दर्शक श्री. तांडेल नाट्य कलावंत, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, नृत्यकलावंत दिग्दर्शक प्रा.परसू गावडे, प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांच्यासह परिसरातील नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सत्कार प्रसंगी प्रस्ताविक आणि स्वागत डॉ. नंदनकुमार मोरे यांनी तर आभार प्रा. परसू गावंडे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta