Sunday , September 8 2024
Breaking News

घटप्रभा मध्यम प्रकल्पातील सर्व पाणी नदिपात्रात सोडणार, कर्नाटक व चंदगडच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

Spread the love

तेऊरवारी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, HA चंदगड पाटबंधारे उपविभाग यांच्याकडून घटप्रभा मध्यम प्रकल्प (ता. चंदगड) जि. कोल्हापुर प्रकल्पाचे Emerganey Gate, Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती व प्रकल्पावरिल इतर अनुषांगिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या प्रकल्पातून दि. १६ एप्रिल ते दि. ५ मे पर्यंत पाण्याचा जास्तीचा विसर्ग नदिपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे
नदि काठावरील शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा इशारा
पाटबंधारे विभागाने दिला आहे. यासंदर्भात आमदार राजेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरलेप्रमाणे घटप्रभा मध्यम प्रकल्पाचे Emergancy Gate Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्तीचे कामासाठी प्रकल्पाचा पाणी साठा निरंक करावयाचा आहे. त्यासाठी कामाचे व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणेचे आहे. घटप्रभा मध्यम प्रकल्प ता. चंदगड जि. कोल्हापुर प्रकल्पाचे Emergancy Gate Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्तीसाठी प्रकल्पाचा पाणी साठा दि १०/०६/२०२२ अखेर निरंक करावयाचा आहे. त्याशिवाय सदरची दुरुस्ती करता येणार नाही. त्याकरिता घटप्रभा मध्यम प्रकल्पामधुन दि. १६/०४/२०२२ पासुन विसर्ग सुरु करणेत येणार आहे. दि. १६/०४/२०२२ ते दि. ०५/०५/२०२२ या दरम्यान जास्तीचा विसर्ग सोडावा लागणार आहे. त्यामुळे नदी पात्रामधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याकरीता नागरिक व कृषीपंप धारक शेतकरी यांना खबरदारी घेणेबाबतचे अवाहन जलसंपदा विभागामार्फत करणेत येत आहे. तसेच ०५/०५/२०२२ ते १०/०६/२०२२ अखेर नदी पात्रामध्ये नियमित पाणी पुरवठा राहील. तरी आपणांस व तशा प्रकारची नोटीस आपले गावामध्ये प्रसिध्द करावी व दवंडी देखिल देवुन जलसंपदा विभागास सहकार्य करण्याची विनंती विनंती उपविभागीय अधिकारी चंदगड पाटबंधारे उपविभाग चंदगड यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बांधकाम कामगारावरील अन्यायाविरोधात पाटणे फाटा येथे आमरण उपोषण

Spread the love  चंदगड : शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *