Thursday , November 21 2024
Breaking News

सर्वधर्म समभाव ठेवूनच विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार राजेश पाटील

Spread the love


अडकुर येथील विविध 1 कोटी 35 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आणि आंबेडकर यांनी घालून दिलेल्या बुद्धांच्या विचारावरच या देशांमध्ये शांतता नांदावी. सर्वधर्म समभाव आपल्यात असावा आणि सर्व जाती, पंथांच्या लोकांना एकत्रित घेऊन विकासच काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि हाच आपला धर्म असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. आज अडकुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विकास कामांचे उद्धाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
यावेळी अडकूर ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांनी केले.
आमदार राजेश पाटील यांच्या विकास निधीतून अडकूर गावातील रु. 1 कोटी 35 लाखांच्या विविध विकास कामांचा ज्यामध्ये अडकूर स्टॅन्ड ते कलनाथ मंदीर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, रवळनाथ मंदीर परिसर सुशोभिकरण, चर्च गल्ली रस्ता खडीकरण व डांबरीकरण, समाजमंदीर परिसर सुशोभिकरण, मस्जिद समोरिल रस्ता काँक्रीटीकरण, मुख्य रस्ता ते शिवशक्ती हायस्कूल अडकूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामासाठी रु.25 लाख खर्च करण्यात आला. अडकूर बस स्टॉप ते शिवाजी चौक 60 लाख, अडकूर धरण दुरुस्ती 35 लाख, आपटेकर गल्ली ते खालची गल्ली 5 लाख, मुस्लिम स्मशानभूमी व ख्रिश्चन स्मशानभूमी – 10 लाख निधी मंजूरी असे एकूण 1 कोटी 35 लाख अडकुर येथे लोकार्पण केले.
यावेळी अडकूर युनिटी फाउंडेशन व व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार हेमंत कामत, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी देसाई (शिरोलीकर), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकु गावडे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश दळवी, पंचायत समिती सदस्य बबन देसाई, बाजार कमिटी प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई, संग्राम देसाई, सरपंच श्रीमती यशोदा कांबळे, गोविंद सावंत, विष्णू पाटील, गोपाळ आंबिटकर, महादेव शिवनगेकर, रामचंद्र दळवी, अली मुल्ला, जयसिंग चव्हाण, राहुल देसाई, बंडू रावराणे, गणेश दळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *