चंदगड : ग्रामपंचायत देवरवाडी येथे रयतेचे राजे, कलाप्रेमी, आरक्षणाचे जनक, प्रजापती, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गावातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर भावना व्यक्त केल्या.
तसेच यावेळी उपसरपंच गोविंद आढाव, ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव, बसवंत कांबळे, सदस्या जयश्री करडे, मंजुळा कांबळे, मनीषा भोगण व तंटामुक्त कमिटी सदस्य विद्या मंदिर मुख्याध्यापिका लोबो मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका, वैजनाथ विद्यालय मुख्याध्यापक राजीव भोगण, सर्व शिक्षक स्टाफ, गावातील सर्व विद्यार्थी वर्ग, अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य सेविका, आशा सेविका, विद्या मंदिर शालेय कमिटी अध्यक्ष उमेश भोगण, उपाध्यक्ष अमृत भोगण व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि समाजसेवक पुंडलिक कांबळे मोहन पाटील, दिलीप कांबळे, उमेश भोगण, राजू करडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे अभिवादन देण्यासाठी
गावातील आरोग्य भवानीमाता दूध डेअरीमधील सायरन वाजवून गावकऱ्यांनी शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम जाधव यांनी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा ग्राम पंचायतीला भेट दिली.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग. बा. पाटील सरांनी केले.