चंदगड : देवरवाडी येथे पेयजल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भारत स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी पेयजल योजना राबवली जात आहे. त्यासाठी राज्यांना पेयजल योजना राबविण्यासाठी तांत्रिक व आर्थिक वित्त सहाय्य केले जाते. देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या पेयजल योजनेअंतर्गत स्वच्छ पेयजल विहीर व पाईपलाईन यासाठी ९६ लाखाचा निधी मंजूर झाला. या पेयजल योजनेच्या उद्घाटनचा शुभारंभ आज ८ मे २०२२ रोजी गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उदार अंतकरणाने स्वतःची शेत जमीन देणाऱ्या लक्ष्मण महादेव कांबळे यांच्या शेतात पार पडला. यावेळी देवरवाडी गावच्या सरपंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते नारळ वाढवून पूजा करण्यात आली. उपसरपंच गोविंद आडाव, ग्रामपंचायत सदस्या मनिषा भोगण, मंजुळा कांबळे, प्रभावती मजुकर, शेतकरी जमीन मालक लक्ष्मण महादेव कांबळे, विष्णू महादेव कांबळे गावातील पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष विक्रांत भोगण, सदस्य दीपक केसरकर, मष्णू वर्पे, विजय सुतार, गणपत भोगण, नरसिंग कांबळे, विनोद मजुकर, पोलीस पाटील, जयवंत कांबळे, बांधकाम कंत्राटदार संजय नाकाडी, देवरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, प्रा.डॉ. नागेंद्र जाधव व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. या पेयजल योजनेच्या माध्यमातून देवरवाडीसारख्या आवश्यक सोयी सुविधापासून उपेक्षित, वंचित असलेल्या व लोकप्रतिनिधीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या गावाच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा आनंद व समाधान ग्रामस्थांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. नागेंद्र जाधव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta