तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आज दुपारी पाटणे फाट्यावरुन घरी येत असताना कृष्णा ऑईल मिलच्या समोर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे धावड काम करणार्या झोपडीकडे बापूसाहेब शिरगावकर, जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय मानवाधिकार संघटन यांचे अचानक लक्ष गेले. समोरील दृष्य पाहून त्यांचा गाडीचे ब्रेक आपोआप दाबले गेले. समोर दृष्य होते ते एका लहानग्या मुलाचे व त्याच्या आईचे. आपले धावड काम करता करता हातात पुस्तक घेवुन मुलाचा अभ्यास घेणारी आई आणि वही, पेन घेवुन आई शिकवत असलेला अभ्यास लक्षपुर्वक करणारा 8/9 वर्षाचा एक लहानगा मुलगा. हे दृष्य पाहुन बापूसाहेबाना या मायलेकाचे कौतुक वाटले. त्यांनी हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.
त्यानंतर ते तशीच गाडी परतवुन दुकानकडे गेलो व काही शालोपयोगी साहित्य आणि काही खायच्या वस्तु घेवुन पुन्हा या मुलाजवळ गेले आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे कौतुक केले. त्याच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. मुळचे कोल्हापुरचे हे कुटुंब पोटासाठी भटकंती करत असते. कुमार सुरज सुरेश पवार इ. 3 री अशी त्याने आपली ओळख सांगितली.
पुढे मोठा होऊन काय होणार? असे विचारले असता अधिकारी होवुन याच तालुक्यात येणार या उत्तराने ते अगदिच भारावून गेले.
झोपडीत राहुनही उच्च शिक्षणाचे व अधिकारी होण्याचे सुरजचे ध्येय पाहुन परमेश्वराकडे प्रार्थना केली की सुरजचे ध्येय आणि त्याचे स्वप्न पुर्ण होवो.
या सर्व प्रकारामुळे एक मात्र खरे की, सर्व सुखसुविधा असणार्या पालकांनी आणि मुलांनी चिंतन करावे.
शेवटी भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मला हाक मार असे सांगुन बापूसाहेब शिरगांवकर तेथून निघाले. आपल्या लेकरासाठी धावड काम करतानाही अभ्यास घेणाऱ्या आणी तो अभ्यास मन लावून करणाऱ्या सुरजचा आदर्श इतर मुलानी ही घेणे गरजेचे आहे.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …