अंकली (प्रतिनिधी) : अथणी येथील हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारा मंजुनाथ गंगाधर मुतगी (वय ३०) याने हेस्कॉम विभागीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर आत्महत्या कोणत्या कारणाने करुन घेतले आहे अद्याप समजले नाही. घटनास्थळी अथणीचे डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta