Wednesday , December 4 2024
Breaking News

पॉलिशच्या बहाण्याने पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण लांबवले

Spread the love

 


सदलगा : सदलगा येथील मिशीगौड पाटील गल्लीतील एका महिलेचे घरात येऊन गंठण पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण (सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये) दोन भामट्यांनी लांबविले. मोठ्या वेशीतून चौथाई वाड्यासमोरुन मिशीगौड पाटील गल्लीत लाल रंगाच्या दुचाकीवरून दोन ऐटबाज भामटे आले होते. त्यांनी याच मार्गाने पोबारा केला. त्यांच्या पाठीवर सॅक, हातात चौकोनी पिशवी, गळ्यात टाय, इनशर्ट केलेले हे दोन भामटे हिंदी बोलत होते, त्यांना कन्नडही समजत होते असे पीडित महिला आणि शेजारच्या महिलांनी सांगितले.
सौ. उज्ज्वला राजगौडा पाटील या महिलेचे गंठण लांबवले. पीतांबरीसदृष्य गुलाबी रंगाच्या पॉलिश पावडरचे प्रतिनिधी असून तांबे, पितळेच्या भांड्यांचे पॉलिश केल्यानंतर त्या भांड्यांना आलेली चमक दाखवत होते, पीडीत उज्ज्वला राजगोंडा पाटील जिचे गंठण लांबवले. तिच्या शेजारच्याही महिलांना तांब्या पितळेची भांडी, चांदीचे पैंजण, कांहीची सोन्याची कर्णाभुषणे त्यांच्या समोर पॉलिश करुन दाखवले आणि ज्यांचे त्यांना परत दिले. संबंधितांची नांवे त्यांच्या जवळील वहित नोंदणी करुन घेण्याच्या बहाण्याने क्षणिक विश्वास निर्माण केला. शेजारीच कांहीं पाच सात घरे सोडून अलिकडील घरांतील महिलांच्याकडील तांब्या-पितळेची भांडी, सोन्याची कर्णाभूषणे पॉलिश करून ज्यांचे त्यांना परत दिले. अशा पद्धतीने विश्वास निर्माण करत पीडित महिलेकडे सोन्याचे दागिने असल्यास द्यावेत, समोर पॉलिश करून देऊ असे विश्वासपूर्वक सांगताना त्या महिलेने तिजोरी कपाटातून पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण आणून त्या दोघांकडे दिले. त्यांच्यातील एकाने पाणी आणण्यास सांगितले, दरम्यान हातचलाखी करून पॉलिश पावडरच्या प्लॅस्टिक पिशवीत गंठण घालत असल्याचे दाखवून हातचलाखी करुन दुसरीच पिशवी पीडीत महिलेला दिली. ती सदर पिशवी पंधरा मिनिटांनंतर उघडावी म्हणजे चांगली चकाकी येईल असे सांगून दुचाकीवरून दोघांनी पोबारा केला. शेजारच्या महिलांनी पीडीत महिलेकडे चौकशी करत गंठण दाखविण्यास सांगितले असता पॉलिश पावडरच्या पिशवीत पावडरमध्ये मुजवलेले तीन दगडांचे खडे आढळून आले.
ही घटना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.
सदलग्यात गेल्या चार महिन्यांत भामट्यांनी हातोहात सोन्याचे दागिने लांबविण्याची ही तिसऱ्यांदा घटना घडली.
या घटनेची माहिती नगरसेवक सतिश पाटील, उद्योजक उदयकुमार पाटील यांनी पोलिसांना फोनवर कळविली. उपनिरीक्षक भरत एच्. यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुनाथ फडतरे यांनी माहिती घेऊन पुढील तपास करत आहेत. या महिलेचे सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे हे गंठण होते, असे पोलिसांना माहिती देताना सांगितले. या घटनेमुळे महिला वर्गात घबराट निर्माण झाली आहे. तसेच सदलग्यातील सलग प्रत्येक महिन्यात घडणाऱ्या या भामट्यांच्या सोने थांबवण्याच्या प्रकारामुळे ठकवणाऱ्याना शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जमिनीच्या वादातून शमनेवाडी येथे एकाचा खून 

Spread the love  सदलगा : शमनेवाडी येथील शेतजमीनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसान खूनामध्ये झाल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *