Sunday , September 20 2026
Breaking News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे उल्लेखनीय यश

Spread the love

 

खानापूर : नुकताच खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाने भरघोस यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल खेळात विजेतेपद मिळविले. त्यामुळे दोन्ही संघांची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित, माध्यमिक विद्यालय जांबोटी या विद्यालयाच्या खेळाडूंनी मुलांच्या कब्बडी स्पर्धेत सुरवातीला लोंढा संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गर्लगुंजी संघावर 15 गुणांनी मात करून अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम सामन्यात ईटगी संघाबरोबर रोमांचकारी खेळ केला आणि 5 गुणांच्या आघाडीने विजेतेपद मिळविले. या कब्बडी संघात, वर्षम सावंत, श्रीनिवास नाईक, नयन पाटील, ओमकार चिगुळकर, आकाश भिंबर, थकाराम जंगले, कृष्णा आवणे, शुभम गुरव, अनंत नाईक, नितेश पाटील यांचा समावेश होता. विद्यालयाच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने लोंढा विभागावर सहज मात केली तर उपांत्य फेरीत गर्लगुंजी संघावर विजय मिळविला. अंतिम सामन्यात बिडी विभागाच्या संघावर 2-1 ने विजय मिळविला आणि या संघाची निवड जिल्हा पातळीसाठी झाली. या व्हॉलीबॉल संघात कुमार वर्षम सावंत, नयन पाटील, संजय एडगे, संतोष चौगुले, शरद पाटील, निखिल पाटील, भूषण पाटील, प्रसाद एडगे याचा समावेश होता. कुमार कल्लाप्पा घाडी याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. कुमार नकुल नंदकुमार देसाई याची जिल्हा योगासन प्रकारासाठी निवड झाली आहे. एकंदरीत विद्यालयाने तालुका क्रीडास्पर्धांमध्ये दुहेरी विजेतेपद संपादन करून आपली परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सर्व खेळाडूंना श्री. आर. एल. पाटील व श्री. टी. एल. बिर्जे यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक श्री. महेश सडेकर व इतर सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *