चिक्कोडी : चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी (२६) यांचा मृत्यू झाला आहे. मंजुनाथ हे मूळचे महालिंगपूरजवळील केसरगोप्प गावचे रहिवासी असून गेल्या ५ वर्षांपासून ते चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत होते. आज कुडची येथून दुचाकीवरून येत असताना अंकली – रायबाग रोडवरील नंदीकुरळी क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांचे कुटुंबीय, पोलीस विभाग आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.