चिककोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदी पात्रात दोन महाकाय मगर तसेच मगरीची पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना पूर आला होता. दिवसाढवळ्या नदीकाठी मगरी दिसू लागल्या. एकसंबा शहरातील शेतकरी विश्वनाथ कागे म्हणाले की, एकसंबा शहरातील दूधगंगा नदी पात्रात सुमारे 8 फूट लांबीच्या मगरी आणि 4 फूट लांबीच्या मगरीचे पिल्ले दिसली.
शेतकरी महिला ज्योती सतवारा म्हणाल्यया पिण्यासाठी पाणी पंपसेट सुरू करण्यासाठी आणि गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलो असता दूधगंगा नदीत मगरी दिसू लागल्याने घाबरत पसरली. दरवर्षी करादगा, भोज, बारवााड, कुन्नूर, गजबरवाडी मांगुर, जत्राट, सदलगा, मलिकवाड, एकसंबा येथे पुरानंतर मगरी दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीकाठच्या शेतात जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. मगरी पकडण्यासाठी वनविभागाने पथक तयार करावे, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta