चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय विभागाच्यावतीने नुकतीच कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर झाली असून विभागीय पातळीवरती मोठ्या बक्षिसांची खैरात करण्यात आली असून तालुका पातळीवरून आपले गाव विभागीय पातळीवरती कसे पोहोचेल यासाठी चंदगड तालुक्यातील काही गाव उत्सुकतेने या स्पर्धेत उतरत आहेत. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ग्रामपंचायतीने आजपासून कोरोना मुक्ती गावाचा ध्यास घेतला असून आज पाटणे फाटा येथील संपूर्ण व्यापारी वर्गाची एंटीजन टेस्ट करण्याचा शुभारंभ केला. गावात दारोदारी जाऊन कोरोना मुक्तीचा प्रचार करण्याचे कार्य सुरू केले आहे. तलाठी राजश्री पचंडी, ग्रामसेवक शिवाजी दुंडगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कोरोना मुक्तीचा प्रसार सुरू असून यापूर्वी हे गाव ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत बक्षीस पात्र ठरले असल्याने आपण गावच्या सहकार्याने 100 टक्के गाव कोरोनामुक्त करून विजय मिळवू असा विश्वास सरपंच शिवाजी तुपारे यांनी व्यक्त केला. यावेळी मजरे कारवे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होत्या. एकंदरीत हागणदारी मुक्त गाव, ग्राम स्वच्छता अभियान या योजनेनंतर चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीनी आता कोरोनामुक्त गाव करण्याचा ध्यास घेतला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …