बेंगळुरू : राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. तसेच कोरोना सकारात्मक दरही कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने सकारात्मकतेचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १०.६६ टक्क्यांवर होता. राज्यात शुक्रवारी मृतांची संख्याही कमी झाली. दरम्यान राज्यात आतापर्यंत ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे १६,०६८ नवीन रुग्ण सापडले आहेत. यासह, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमितांची संख्या २६,६९,५१४ वर पोहोचली आहे. तर यापैकी २३,५८,४१२ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात सध्या २,८०,१८६ सक्रिय प्रकरणे आहेत. या प्रकरणातील मृत्यूचे प्रमाण २.२६ टक्के आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१५ टक्के आहे.
राज्यातील १६,०६८ नवीन रुग्णांपैक्की २० टक्के नवीन रुग्ण हे बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ३,२२१ रुग्ण सापडले. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ११,७७,४९६ वर पोहोचली असून यापैकी १० लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १,३१,१७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण १४,४८२ रुग्ण मरण पावले आहेत. बेंगळूर शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६२ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.२२ टक्के आहे.