खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी पार पडला.
यावेळी स्वागताध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी स्वागत केले. तर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंगेशजी भिंडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारत माता फोटो पुजन श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राघवेंद्र कागवाड यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बोलताना मंगेशजी भिंडे म्हणाले की, कोरोनाच्या काळात जनतेला जीवन जगने नकोसे करून टाकले. अशावेळी अनेकांकडून सेवा करण्यात आली. ही समाज सेवा म्हणजे आईची सेवा आहे.
यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाला जनकल्याण ट्रस्टचे अशोक शिंत्रे, महालक्ष्मी कोविड सेंटरचे उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील, ज्येष्ठ स्वंयसेवक सदानंद कपिलेश्वरी, तसेच यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, नगरसेवक आप्पया कोडोळी, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, धनश्री सरदेसाई, गुंडू तोपिनकट्टी, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात जवळपास २०० कोरोना योद्ध्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्प, मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वासुदेव चौगुले यांनी केले. आभार पंडित ओगले यांनी मानले.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …