बेळगाव : हिंदवाडी सर्वोदय कॉलनी येथील महापालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अकरा घराविरोधात महानगरपालिकेने आज गुरुवारी पोलीस बंदोबस्तत कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान काही कुटुंबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता कारवाई करण्यात आली.
सर्वोदय कॉलनीतील महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. ही जागा महानगरपालिकेने शाळा आणि उद्यान यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे खुल्या जागेत घरे बांधून अतिक्रमण केलेल्या रहिवाश्यांना जागा खाली करण्यासंदर्भात सूचना केली होती. ११ जून रोजी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी विरोध करून पिटाळून लावले होते. त्यानंतर त्या रहिवाश्यानी महानगरपालिका आयुक्तांना भेटून आपल्याला बेघर करू नका अशी विनंती केली होती. त्यावेळी आयुक्त के. एच. जगदीश यांनी विस्थापितांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महानगरपालिका उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर व अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अतिक्रमण हटविण्यात येत असताना काही नागरिकांनी कारवाईला विरोध केला, त्यावेळी उपायुक्त निपाणीकर यांच्याशी स्थानिकांनी वाद घातला तेव्हा कारवाईला अडथळा निर्माण करू नका सदर घरे अनधिकृत आहेत ती रिकामी करा अशी सूचना तुम्हाला देण्यात आली होती. आयुक्तांनी तुमची सोय निवारा केंद्रात केली आहे, अशी विनंती लक्ष्मी निपाणीकर यांनी केली, तरीही काहींनी सदर कारवाईला विरोध दर्शविला त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर कारवाई पुढे चालू करण्यात आली परंतु या जागेतील असलेल्या छोट्या गणपती मंदिरला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन निपाणीकर यांनी यावेळी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta