बेळगाव : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाले आहेत. सिमेंट व स्टीलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बांधकाम व्यवसायाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याकडे लक्ष देऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलावीत आणि बांधकाम व्यवसायात दिलासा द्यावा, अशी मागणी क्रेडाई व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भाचे निवेदन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनाही पाठविण्यात आले आहे.
क्रेडाई आणि सीसीईए पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली. त्याचबरोबर आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदनही सादर केले. बांधकाम क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी 250 हून अधिक उद्योग प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संलग्न आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. असे असताना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सिमेंट आणि स्टीलच्या दरात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिक व संलग्नित व्यवसायाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक प्रकल्प अर्ध्यावर थांबले आहेत. बांधकाम क्षेत्राला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन बांधकाम व्यावसायिकांच्या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी क्रेडाईचे चैतन्य कुलकर्णी, संघटनेचे अध्यक्ष पी. ए. हिरेमठ, खजिनदार एस. ए. पाटील, राजेंद्र मुतगेकर, गोपाळ कुकडोळकर, युवराज हूलजी, प्रशांत वांडकर व अन्य सदस्य उपस्थित होते.
Check Also
खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Spread the love खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील …