तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दोडामार्गचे नुतन पोलिस निरीक्षक आर. जी. नदाफ यानी चोरट्या दारू वाहतूकीविरोधात धडक कारवाई करत चंदगड तालुक्यातील दोघाना अटक करुन मोठा दारूसाठा जप्त केला.
गेल्या काही वर्षांपासून गोवा राज्यातून दोडामार्ग येथून चंदगड व बेळगावकडे दारूची अवैध्यरित्या वाहतूक होत होती. याची माहिती पोलिस दोडामार्ग पोलिसाना समजली. यापूर्वी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोडामार्ग पोलिसांनी पो. नि. नदाफ यांच्या सुचनेनुसार सापळा रचला.
सासोली -देसूर वाडी येथे येथे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून दारू वाहतूक करताना पकडण्यात आली.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. पण असे असतानाही चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक चालूच आहे. अशीच दारू वाहतुक सुरू असल्याची खबर पोलिसाना मिळाली. यानुसार सापळा रचून चंदगड तालूक्यातील तुकाराम वैजू सुपल (वय -२७ वर्ष रा. माडवळे) व वैभव विठोबा चव्हाण रा . करेकुंडी या दोघाना अवैध दारू वाहतूक करताना पकडण्यात आले. याबरोबरच गोवा बनावटीचे विविध कंपन्यांचे दारूचे बॉक्स गाडीमध्ये मिळून आले. चंदगडच्या या दोघाविरोधात दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.