कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने पटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. ते कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. तसेच पवार यांनी यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट वाढला तरी काही हरकत नाही पण टेस्ट दोन पटीने वाढवा अशा सुचना जिल्हा प्रशासनाला केल्या. तसेच, यावेळी त्यांनी नागरिक हे पोलिसांना पाहून मास्क घालतात असे म्हणत नाराजी व्यक्त करत गरज पडल्यास आणखीन कडक निर्बंध करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी सध्या कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला किंवा शासनाला काणालाही त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. खासगी रूग्णालयांनी उपचार करताना आवाजावी बिल घेऊ नये असे म्हटले आहे.
त्याचबरोबर पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गृहविलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरण वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे गांभीर्यांने पाहत लहान मुलांसाठी टास्क फोर्सटी स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सध्या ऑक्सिजन आणि फायर ऑडिवर बराच खर्च होत असल्याचेही त्यांनी म्हटले. तर सिपीआरच्या फायर ऑडिटचा होणार खर्च हा राज्य शासन उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Check Also
महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला
Spread the love मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा …