बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील वीज पुरवठ्यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्या सोडवा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व बेळगाव तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
खानापूर व बेळगाव तालुक्यातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी संयुक्तपणे
हेस्कॉमचे अधिकारी श्रीधर गुडीमनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बेळगाव तालुका युवा आघाडीचे संतोष मंडलिक, ऍड. श्याम पाटील, सुधीर चव्हाण,
यांनी तालुक्यातील बिजगर्णी व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. या भागातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेक महिन्यांपूर्वी सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे. मात्र अजूनही सबस्टेशनचे काम हाती घेण्यात आलेले नाही तसेच एप्रिल महिन्यापासून प्रति वीज दरवाढ करण्यात आली आहे ही दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली तर खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी हलशी व बैलूर येथे 11 केव्ही सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे मात्र अजूनही सबस्टेशनच्या कामाला गती देण्यात आलेली नाही याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असून गेल्या वेळी खानापूर तालुक्यातील विजेच्या समसस्यांबाबत निवेदन दिले असता हेस्कॉममध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशी माहिती देण्यात आली होती त्यामुळे हेस्कॉमने कर्मचारी भरती करण्यास प्राधान्य द्यावे तसेच यासाठी तालुक्यातील डिप्लोमा व आयटीआय झालेल्या युवकांना कंत्राटी पध्दतीवर नोकरी द्यावी, तालुक्यात पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होतो. त्याकडे लक्ष द्यावे, भूमिगत वीज वाहिन्या घालण्याची परवानगी देण्यात यावी तसेच निरंतर ज्योती योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी हेस्कॉम अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी सचिव सदानंद पाटील, मयूर बसरीकट्टी, दामोदर नाकाडी, मोनाप्पा संताजी, दामोदर नाकाडी, महेश मोरे, नवनाथ पुजारी, किशोर हेब्बाळकर, राजू किनयेकर, विशाल बुवाजी, सुधाकर देसाई, मल्लाप्पा पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta