मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या भेटीवेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी या भेटीचा फोटो देखील शेअर केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta