गडहिंग्लज : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या विभागात गेली अनेक वर्षे अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश भोईटे गडहिंग्लज व अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष कोरे सहकारी विविध पातळीवर भरीव स्वरूपाचे कार्य करीत आहेत. जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी मोहीम, गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यासाठीचे आवाहन, फटाके मुक्त दिवाळी, गणेश चतुर्थी, इत्यादी सण साजरे करण्याचे आवाहन. अशा अनेक प्रकारची कार्ये व विज्ञानवादी चळवळीतून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी सातत्याने सहकार्यांना सोबत घेऊन प्रयत्न केले जात आहेत. या कार्याची दखल घेऊन यावर्षीचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने देण्यात येणारे आधारस्तंभ पुरस्कार येथील प्रा. प्रकाश भोईटे व प्रा. सुभाष कोरे यांना जाहीर झाले असून सदर पुरस्कार 15 सप्टेंबर 2024 रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे प्रसिद्ध व ज्येष्ठ कवयित्री निरजा यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta