
गडहिंग्लज : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नूल या शाखेत ग्राहकांना सुविधा न देता अरे तुरे भाषा कर्मचारी वापरत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी शाखेमध्ये शेतीच्या कामासाठी बँक खाते 10 लोकांनी खाते काढण्यासाठी अर्ज सादर केले. पण कर्मचाऱ्यांनी खाते ओपन करून पासबुक न देता आज- उद्या टोलवाटोलवी करत होते. विचारणा केल्यास सही करायची आहे शाखाप्रमुख रजेवर आहेत. आता मिळणार नाही काय करायचे ते करा मी कोणाचा फोन घेणार नाही. दुसऱ्या बँकेत खाते काढा अशी उद्धटपणे ग्राहकांना बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याने अखेर दहा शेतकऱ्यांनी गडहिंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्याकडे लेखी दाद मागून मदत करण्याची मागणी केल्याने अखेर शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्यासह शिवसैनिकांनी बँक ऑफ महाराष्ट्र नुल येथे धडक देत चांगलेच फैलावर घेत ताबडतोब शाखेतील कामकाजात सुधारणा करावी, भोंगळ कारभारात सुधारणा करावी, येणाऱ्या ग्राहकांना चांगली, वागणूक द्यावी अशी दम शिवसेना स्टाईलने कडक सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आले तर दहा शेतकऱ्यांना अत्यंत पासबुक गरजेचे असल्याने पासबुक देण्यास भाग पाडले जर सुधारणा न झाल्यास बँकेच्या शाखेला कुलूप लावून व काम बंद पाडू असा इशारा देण्यात आला. यावेळी केदार डांग, मंथन डांग, संभाजी येरुडकर, सचिन सावंत, मल्लिकार्जुन तेरणेसह आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta