Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

राष्ट्रीय स्तरावर कु. दत्तगुरू धुरीचे घवघवीत यश

  बेळगाव : केंद्रीय विद्युत अनुसंधान, नवी दिल्ली, भारत सरकार आयोजित वीज वाचवा पर्यावरण वाचवा या राष्ट्रीय स्तरावरील भिंतीचित्र स्पर्धेमध्ये बेळगाव येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमधील दहावीमध्ये शिकत असलेल्या कु. दत्तगुरु सुभाष धुरी याने कर्नाटकात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी नवी …

Read More »

तुम्मरगुद्दी गावामध्ये रस्ते विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुम्मरगुद्दी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्ते बांधकामाच्या शुभारंभाबरोबरच, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नवीन जिमचे उद्घाटन करण्यात आले. बलवान युवकच सशक्त देश घडवू शकतात. त्यामुळे युवकांनी या सुविधेचा लाभ घेऊन …

Read More »

जैन धर्मियांचा बेळगावात भव्य मोर्चा!

बेळगाव : जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मियांनी आज सकाळी बेळगावात भव्य मोर्चा काढला. जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी परिसराला अभयारण्य म्हणून सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला जाणे-येणे कठीण होणार आहे. त्यामुळे जैन …

Read More »

बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणार्‍यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली

  नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली …

Read More »

नियंत्रण सुटून गाडीचा चोर्ला घाटात अपघात; एक जण ठार

  खानापूर : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली. सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी) असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने …

Read More »

आज येळ्ळूर येथे महामेळावा जनजागृती बैठक

  येळ्ळूर : कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 19 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी श्री चांगळेश्वरी मंदिरात सायं. 7 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी येळ्ळूर येथील आजी माजी जिल्हापरीषद सदस्य, …

Read More »

17 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द; बेळगाव जिल्हा पोलिसांची वर्षभरात मोठी कामगिरी

  पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव : सन २०२२ मध्ये चोरी, घरफोडी तसेच फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा बेळगाव जिल्हा पोलिसांनी यशस्वी तपास करून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ३२४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

मंगळूर स्फोट प्रकरणावरून भाजप-कॉंग्रेसमध्ये द्वंद्व; दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप

  बंगळूर : कुकरचा स्फोट हा मतदार डाटा चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना लोक मूर्ख वाटतात. ते निवडणुकीच्या फायद्यासाठी लोकांच्या भावना भडकवत आहेत, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. त्यावरून भाजप व कॉंग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून कॉंग्रेस-भाजपने एकमेकावर चिखलफेक केली आहे. १९ नोव्हेंबर …

Read More »

शिंदे सरकार सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी : उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई

  चंदगड : सीमाभागातील अडीअडचणी समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे मत राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.‌ शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा …

Read More »

ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लांबणीवर

  बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. पण बेळगांव शहरातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सत्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय सत्कार सोहळा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे …

Read More »