Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची ६ वर्षाची परंपरा!

शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. यंदा हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणी मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. यंदाही …

Read More »

चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे 2 जुलै रोजी वितरण

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्हीटीयूचे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजीअध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता फौंड्री …

Read More »

मराठा मंडळ महाविद्यालयाला नॅकचा ‘ए प्लस’ ग्रेड

बेळगाव : सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यमापनामध्ये ‘ए प्लस’ ग्रेड मिळाला असून या पद्धतीने बेळगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा मंडळाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाने यापूर्वी तीन नॅक यशस्वीरित्या पूर्ण केले …

Read More »

गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये : प्रकाश मैलाके

संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. याकरिता बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषद मुलांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावाण्याचे कार्य करीत असल्याचे बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मैलाके यांनी सांगितले. ते बाड सरकारी प्रौढ शाळेतील गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप …

Read More »

संकेश्वर पोलिसांकडून तीन मोटारसायकल चोर गजाआड

चोरांकडून २ लाख किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी हे संकेश्वरातील जुना पी. बी. रोड येथील युपी धाब्याजवळ वाहन तपासणीचे कार्य करताना तीन मोटारसायकल चोर सापडले आहेत. बेळगांव निपाणी येथील सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबूली चोरांनी केली आहे. याविषयीची पोलीस सूत्रांकडून …

Read More »

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची …

Read More »

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्‍यमंत्रीपदी शपथबद्‍ध झाले. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र …

Read More »

उचगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव (प्रतिनिधी) : उचगाव येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घराशेजारील शेतवडीतील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. घरच्या भाऊबंदकीच्याच शेतीच्या पैशांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातून ही आत्महत्या त्याने केल्याचे त्यांच्या मुलाकडून सांगितले जात होते. या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की, श्रीकांत शंकर जाधव (वय 56) हा सकाळी …

Read More »

मराठा सेवा संघ बेळगांव यांच्यावतीने रविवारी मराठा युवा उद्योजक मेळावा

बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने मराठी युवकांना संघटित करून व्यवसायाबद्दल असलेल्या अडीअडचणी दूर करून मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगांव यांच्या वतीने रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगांव येथील मराठा सभागृहामध्ये …

Read More »

झाडे जगविण्याचे कार्य करायला हवे : प्राचार्या प्रियांका गडकरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त सांगणे नको. प्रत्यक्षात झाडे लावून ते जगविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे प्राचार्या सौ. प्रियांका प्रशांत गडकरी यांनी सांगितले. येथील श्री दानम्मादेवी शिक्षण संस्था संचलित मदर्स टच किंडर गार्टन शाळेच्या वनमहोत्सव त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे …

Read More »