Sunday , September 20 2026
Breaking News

गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये : प्रकाश मैलाके

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. याकरिता बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषद मुलांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावाण्याचे कार्य करीत असल्याचे बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मैलाके यांनी सांगितले. ते बाड सरकारी प्रौढ शाळेतील गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाड ग्रामपंचायत अध्यक्षा शिवलिला मूर्ती यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक ए. एम. तहसीलदार यांनी केले. प्रकाश मैलाके यांनी विश्व मानव अधिकार परिषदेच्या माध्यमातून बाड सरकारी प्रौढ शाळेतील १७ गरिब कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावाण्याचे कार्य करीत आहेत. कार्यक्रमात प्रकाश मैलाचे यांचे हस्ते शालेय मुलांना बॅग, नोटबूक, पेन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.. कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष शिवानंद कापसे, ग्रामपंचायत अध्यक्षा शिवलिला मूर्ती, विश्व मानव अधिकार परिषदचे उपाध्यक्ष रवींद्र जाडर, सतीश मन्नीकेरी, बसवराज साळुंखे, रजाक कुडची, कुमार कोळी, एस. एस. पाटील, शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *