Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

संजय राऊतांमुळे मविआत तणाव निर्माण होतोय!

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांकडे तक्रार मुंबई : राज्यसभेतील सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर हल्लाबोल केला. अपक्ष आमदारांनी शब्द फिरवल्यानं शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याचं म्हणत राऊतांनी घोडेबाजाराचा आरोप केला. राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे …

Read More »

सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेचा अर्ज मागे!

मुंबई : विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी 5 मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे 5 अधिकृत उमेदवार …

Read More »

सांगलीत पानपट्टी चालवणार्‍याच्या मुलीला खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक!

सांगली : सांगलीत पानपट्टी चालवणार्‍याच्या मुलीने खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. वेटलिफ्टिंग खेळात काजोल महादेव सरगर हिने 40 किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. खेलो इंडिया नंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. काजोल सरगर ही एका सामान्य कुटुंबातील …

Read More »

नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी; भारताचा क्रिकेटपटू वेंकटेश भडकला!

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा जगभर निषेध केला जात आहे. एका बाजूला नुपूर शर्मा यांच्याविरोधात आंदोलन सुरू असताना दुसर्‍या बाजूला असे ही काही लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देत आहेत. यात भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. भारताचा माजी …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजहंसगड (येळ्ळूर गड) परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ऑपरेशन मदत, इनरव्हील क्लब, मजदूर नवनिर्माण संघ, वनविभाग सोशल फाॅरेस्ट्री व सुळगे (येळ्ळूर) ग्रामपंचायत यांच्यावतीने राजहंसगड व जांबोटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जांभुळ, सीताफळ, चिंच, चाफा, करंज, सुबाभूळ, आंबा, वड, पिंपळ व …

Read More »

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक चोपडे यांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक के. व्ही. चोपडे हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कंत्राटदार शिवाजी अतिवाडकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए. ए. घोरपडे, प्राचार्य विक्रम पाटील, डी. बी. पाटील शिवाजी …

Read More »

राहुल गांधी ‘ईडीं कार्यालयाकडे रवाना, प्रियांका गांधीही ‘ईडी’विराेधात रस्त्यावर

दिल्‍ली : नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी आज काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांची सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. याविरोधात आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून ‘ईडी’ कारवाईविरोधात निदर्शने करण्‍यात आली. दिल्‍लीत प्रियांका गांधीही रत्‍यावर उतरल्‍या असून राहुल गांधीसह ईडी कार्यलयाकडे रवाना झाल्‍या आहेत. दिल्‍लीत मान सिंह रोडवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. त्‍यांनी …

Read More »

विधान परिषदेसाठी बेळगावात मतदान

बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला …

Read More »

गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …

Read More »

मानसिक अस्वास्थामुळे खानापूर भागात भटकत असलेल्या व्यक्तीला कुटुंबियांकडे स्वाधीन

खानापूर : परभणी जिल्ह्यातील एक इसम विमनस्क अवस्थेत खानापूर तालुक्यातील शिवठाण रेल्वे ट्रॅकच्या आसपास फिरत असताना रेल्वे किमेन विष्णू नाळकर यांना भेटला. त्यांच्याकडून तो थोडा वेळ बोलत राहिला पिण्यासाठी पाणी मागितले. विष्णू यांनी बोलता बोलता त्याला तू कुठून आलास इथे, काय करतोस असे विचारले असता आपण परभणी जिल्ह्याचा असल्याचे त्याने …

Read More »