Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर म. ए. समितीच्यावतीने सीमासात्याग्रही श्रध्दांजली!

खानापूर (प्रतिनिधी) : कै. सीमासत्याग्रही नागाप्पा होसुरकर यांच्या धर्मपत्नी कै. श्रीमती नर्मदा होसुरकर व समिती नेते कै. नारायण मल्लाप्पा पाटील कुप्पटगिरी यांना खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने निडगल येथे सोमवार दि. १४ रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निडगल गावाचे सुपुत्र सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एम. पी. कदम होते. प्रास्ताविक …

Read More »

मराठा स्वामींना बेळगाव दौऱ्याचे आमंत्रण

बेळगाव : 15 मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या एकत्रिकरणाच्या कार्यक्रमासाठी व बेंगळोरस्थित मराठा समाजाच्या मठाचे मठाधीश म्हणून अधिग्रहण केल्याबद्दल मंजुनाथ स्वामींचा सत्कार करण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले, मराठा समाजाचे महत्वाचे अधिष्ठान बेंगळोर येथे आहे. हे सर्व समाजाला …

Read More »

नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई : दाऊद इब्राहिम मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे. तरीही मलिकांना जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं हायकोर्टाने म्हंटलेलं आहे. त्याचबरोबर ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली …

Read More »

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसर्‍या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (उथउ) रविवारी बैठक झाली. या बैठकीत …

Read More »

ग्रामीण आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना सत्तेचा माज : धनंजय जाधव

बेळगाव : गणेशपुर-सरस्वती नगर येथील श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांचे कोणत्याही शासकीय अथवा न्यायालयीन आदेशाविना बुल्डोझरने घर पाडण्यात आले, तसे पाहता त्या घराबाबत उच्च न्यायालयाने श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा 60 फुट रस्ता निर्मितीसाठी घर पाडण्यात आले असे सांगण्यात आले. रस्ता व्हावा अशी आमची …

Read More »

शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच : कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुर : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे. कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद …

Read More »

पाण्यासाठी वन्यजीवांची धावाधाव

निपाणीत उन्हाची तीव्रता वाढली : पाणवठे पडू लागले कोरडे निपाणी : गेल्या आठ दहा दिवसापासून निपाणी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. डोंगर भागातील बहुतांश पाणवठे, तलाव डबकी, ओढे कोरडे पडत असल्याने उन्हाच्या वेळी सावलीच्या आधारासोबतच तहान भागविण्यासाठी विविध पक्षासह वन्यजीवांची पाण्याच्या शोधात धावाधाव सुरू झाली आहे. निपाणी तालुक्यात काही डोंगराळ …

Read More »

भवानीनगर येथे बांधकाम व्यावसायिकाची हत्या

बेळगाव (प्रतिनिधी) : शहरातील भवानीनगर उपनगराच्या जवळ एका व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्रकार मंगळवारी भल्या पहाटे घडला आहे. चाकूने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये तिखट पूड टाकून त्याला भोसकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे टिळकवाडी, भवानीनगर, मंडोळी रोड परिसरात एकच खळबळ माजली …

Read More »

सौंदलगा येथे शिगावे मळ्यानजीक अपघातात दहा ते पंधरा ऊसतोड मजूर जखमी

सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्गावरील शिगावे मळ्या नजीक ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन अपघात झाला. त्यात १० ते १५ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (ता.१४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. ट्रॅक्टर चालक फरारी झाला आहे. याबाबत …

Read More »

वादग्रस्त हिजाब वादाचा आज निकाल होणार जाहीर

निकालाबाबत राज्यभरात उत्सुकता बंगळूर : वादग्रस्त हिजाब प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालय उद्या (ता. १५) जाहीर करणार आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य पीठाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाचा निकाल काय येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. उडुपीमधील कापू तालुक्यातील हिजाब वाद जिल्ह्याच्या इतर भागांबरोबरच संपूर्ण राज्यात …

Read More »