Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सौंदलगा केंद्रशाळेत चौथे एकदिवशीय शिबीर उत्साहात संपन्न

सौंदलगा : येथील सरकारी मराठी शाळेत चौथी शाळा अभिवृध्दी देखभाल समितीचे एकदिवशीय शिबीर खेळीमेळीत पार पडले. प्रारंभी रोपाला पाणी देऊन कार्यशाळेचे प्रशिक्षणार्थीनी उद्घाटन केले. स्वागत आणि प्रस्तावना संपन्नमुल अधिकारी कटगेरी यांनी केली. यावेळी लॉर्ड बॅडेण पॉवेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी लॉर्ड पॉवेल यांचा …

Read More »

चोराने बाईक सोडून पळ काढला…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात काल सोमवार दि. २१ रोजी चोराने बाईक सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयीची समजलेली माहिती अशी, श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभाला उपस्थित राहिलेले शंकरलिंग सौहार्द सहकारी संस्थेचे सेक्रेटरी श्रीकांत गायकवाड यांची होंडा ॲक्टीवा मोटारसायकल चोरांनी कांही अंतरापर्यंत घेऊन जाऊन दुचाकी सोडून पळ काढला आहे. संकेश्वरात …

Read More »

बालपण देगा देवा….

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी छोट्या दोस्तांची इलेक्ट्रीक बाईक चालविलेला व्हीडिओ चांगलाच चर्चेत दिसतो आहे. रमेश कत्ती यांच्याविषयी लोकांत एकीकडे विरोधाभास तर दुसरीकडे मोठा आदरभाव दिसतो आहे. रमेश कत्ती छोट्या मुलांची इलेक्ट्रीक बाईक चालवित असलेला व्हीडिओ पाहुण काहींनी काय हा पोरकटपणा …

Read More »

एसडीव्हीएसतर्फे बॅडमिंटनपटू अप्पासाहेब लाडखानचा सन्मान

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित बीबीए काॅलेजचा बॅडमिंटनपटू अप्पासाहेब रशीद लाडखान यांने नुकतेच धारवाड येथे पार पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंगल अंडर-19 प्रथम क्रमांक तर मिक्स डबल बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेबदल एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी त्याचे विशेष अभिनंदन करुन सन्मानित केले. …

Read More »

हुक्केरीचा मीच नेक्स्ट आमदार : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी विधानसभा आखाड्यात उतरणार आणि विजयी होणार यात तीळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, हुक्केरी विधानसभा जिंकणे हे आपले लक्ष्य आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी आशीर्वाद केला होता पण बॅडलक आपल्याला पराभव पत्करावा लागला. 2023 ची निवडणूक तशी मोठी …

Read More »

मुदत संपली तरी असोगा रेल्वे गेट बंदच, प्रवाशांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील खानापूर रेल्वेस्थानकावर जवळ असलेल्या असोगा रेल्वे गेटचे दुरूस्तीचे काम दि. २२ पर्यंत संपवून देतो. व असोगा रेल्वे गेट वाहतुकीस मोकळे करतो, असे आश्वासन रेल्वे खात्याचे इंजनियर श्री. शशिधर यांनी असोगा भागातील जनतेला दिले होते. मात्र …

Read More »

हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेची बेळगावात निदर्शने

बेळगाव : शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याची समाजकंटकांनी भीषण हत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावातही मंगळवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध करत, मारेकऱ्यांना अटक …

Read More »

शिवमोगा दंगलीला ईश्वरप्पा जबाबदार : सिद्धरामय्या

बेंगळुरू : शिवमोगा येथील बजरंग दलाच्या २३ वर्षीय हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास घ्यावा, असे आवाहन करत याठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलाय. बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात शिवमोगा जिल्ह्यात …

Read More »

तारांगणतर्फे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा

बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल …

Read More »

युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. …

Read More »