Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

हिजाब घालून वर्गात प्रवेश न दिल्याबद्दल विद्यार्थिनींकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बेळगाव : हिजाब आणि बुरखा घालून पूर्वतयारी परीक्षेला उपस्थित राहू न दिल्याने लिंगराज महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थिनींनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी म्हणाल्या की, धार्मिक नियमांचे पालन करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मुस्लिम मुली हिजाब आणि बुरखा घालतात मात्र आता वर्गात प्रवेश बंदी करण्यात येत आहे. …

Read More »

शिवमोग्गात बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या, शाळा- कॉलेजात पोलीस तैनात

शिवमोग्गा : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर अद्याप पडदा पडल्याचं चित्र नाही. दिवसेंदिवस कट्टर समूहांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रकार सुरू असून यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तणावाचं वातावरण आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात आणखी तणाव वाढला. या 26 वर्षांच्या कार्यकर्त्याने …

Read More »

देशाच्या प्रगतीस शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे

डॉ. आनंद पाटील : कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. विविध प्रकारची पिके घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकयांची भूमिका महत्वाची आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून या शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगती मध्ये हातभार लावला आहे. त्यामुळे प्रत्येक बळीराजाचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे …

Read More »

शिरगुप्पीच्या ‘वैष्णवी’ला मिळाला एमबीबीएस प्रवेश!

‘बिरेश्वर’ शाखेतर्फे सत्कार : सर्जन होण्याची इच्छा निपाणी (वार्ता) : बालवयापासून ते अगदी एमबीबीएस प्रवेश घेईपर्यंत एक अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या शिरगुप्पी (ता. निपाणी) येथील वैष्णवी संभाजी चव्हाण हिला एमबीबीएस साठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाल्याने शिरगुप्पी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त एकसंबा येथील बिरेश्वर संस्थेच्या शिरगुप्पी शाखेतर्फे …

Read More »

चांगळेश्वरी स्पोर्टसने पटकावले श्री गणेश चषक

येळ्ळूर : येळ्ळूर येथे नुकत्याच झालेल्या फुल्लपीच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा ग्रामीण भागातील संघासाठी मर्यादित होती. या स्पर्धेत एकूण 40 संघांनी भाग घेतला होता.  रविवार दि. 20/02/2022 रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यासाठी चांगळेश्वरी स्पोर्ट्स व बिडी संघ आमनेसामने होते. यात चांगळेश्वरी स्पोर्टसने श्री गणेश चषक पटकाविले. …

Read More »

शिवरायांच्या विचारांच्या जागरसाठी दुर्गराज रायगड मोहिम

आकाश माने : दोन दिवसात विविध उपक्रम निपाणी (वार्ता) : कोणत्याही जाती धर्मात न अडकता एकसंघ होऊन निपाणी शहरात सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अखंड जागर व्हावा, यासाठी मावळा ग्रुपची सुरुवात केली. छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या युवा पिढीला समजावेत या उद्देशाने संघटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी …

Read More »

शिवाजी महाराजांचे कायदे सर्वांना प्रेरणादायी

डॉ. भारत पाटील : कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे …

Read More »

खानापूर अबकारी खात्याकडून गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अबकारी खात्याकडून गोवाहून येणारी चोरटी दारू पकडण्यात खानापूर अबकारी खात्याचा नेहमीच हातखंडा आहे. खानापूर तालुका हा गोवा राज्याच्या हद्दीला लागुन आहे. त्यामुळे गोव्यातुन कोणत्याही मार्गाने चोरटी दारू वाहतूक होत असेल तर खानापूर अबकारी खात्याकडून हमखास कारवाई होतेच. अशाच प्रकारे शनिवारी दि. १९ रोजी खानापूर तालुक्यातील …

Read More »

प्रत्येकानी शिवरायांचा आदर्श जोपासावा

मंत्री शशिकला जोल्ले : शिवजयंती उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : शहरात शनिवारी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्यास मंत्री शशिकला जोल्ले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना त्यांनी आपल्या काळात समान वागणूक …

Read More »

जीवन विम्याने सावरले निपाणीतील कुटुंब!

एलआयसीने दिला अपघाती अपंगत्वाचा लाभ : चिक्कोडी विभागातील पहिलीच घटना निपाणी (वार्ता) : चिक्कोडी-निपाणी एलआयसी ऑफ इंडियाचे निपाणी येथील बेळगाव नाका माळी कॉम्प्लेक्समधील एलआयसी कार्यालयाचे प्रतिनिधी आनंद संकपाळ यांचे ग्राहक एन. पी. चव्हाण यांचा मोठा अपघात झाला होता. त्यामुळे त्यांचे शारीरिक मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर चार-पाच महिने चव्हाण हे …

Read More »