Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुधवारी सुवर्ण विधानसौधवर आंदोलन

बेळगाव (प्रतिनिधी): कर्नाटक राज्यात पन्नास लाखाहून अधिक संख्येने मराठा समाज आहे. परंतु या समाजाचा आत्तापर्यंत केवळ राजकीय स्वार्थापोटी उपयोग करून घेतला गेला आहे. मराठा समाजाला आरक्षणही नाही. त्यामुळेही विद्यार्थी आणि युवकांचे मोठे नुकसान होत आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सहा आमदार असतानाही एकालाही मंत्रीपद देण्यात आलेले नाही. या अन्यायाविरोधात बुधवार …

Read More »

सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित

काकासाहेब पाटील : लेफ्टनंट रोहित कामात यांचा सत्कार निपाणी : पूर्वीच्याकाळी सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांचा ओढा कमी होता. पण अलीकडच्या दहा वर्षाच्या काळात देशाच्या संरक्षणासाठी युवक मोठ्या प्रमाणात सरसावत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. देशाच्या संरक्षणामध्ये सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लेफ्टनंट रोहित कामत यांच्या निवडीमुळे निपाणीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला …

Read More »

कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे विजय देवणे यांना रोखले

कोगनोळी : बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने टिळकवाडी येथे आयोजित महामेळाव्यास महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांची गाडी कोगनोळी येथील टोलनाक्यावर अडवण्यात आले आहे. महाराष्ट्र इथून बेळगाव येथील या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळी जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलीस प्रशासनाच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल

तिन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज निपाणी : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.13) पाचव्या दिवशी तिन्ही गटाकडून एकूण 12 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गेल्या 8 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील तिन्ही ही गटाकडून आज सोमवार (ता. 13) रोजी पाचव्या दिवशी या ठिकाणी …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य आमदारांची दांडी

224 पैकी केवळ 80 आमदारच उपस्थित बेळगाव : 2 वर्षांनंतर बेळगावात आज सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला. 10 दिवसीय अधिवेशनाची सर्व जय्यत तयारी प्रशासनाने केली. हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री आणि आमदार बेळगावात दाखल झाले. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि विरोधी सदस्यांनी हजेरी लावली. मात्र पहिल्या दिवशीच्या कामकाजाप्रसंगी बहुतांश …

Read More »

मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधात शेतकर्‍यांचा शड्डू

बेळगाव : बेळगावात आजपासून सुरु झालेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकर्‍यांनी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकर्‍यांनी राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला. बेळगावात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ बसली. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही …

Read More »

महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी शिव-समिती शिवारापर्यंत

  विविध गावातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित मराठी भाषिक महामेळाव्यासाठी सर्व पातळीवर जनजागृती केली जात असून शिव- समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध गावातील शेतशिवारापर्यंत जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि महाराष्ट्र …

Read More »

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्ण विधानसौध सज्ज

बेळगाव :   तब्बल दोन वर्षानंतर बेळगावच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची धास्ती घेत काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीत बेळगावात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. महामारीच्या काळातील हे …

Read More »

शिवसंदेश भारत पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न

मराठी तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे : महादेव चौगुले बेळगाव (रवींद्र पाटील) : आशादायी व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे. सत्कार्य व कर्तृत्वान व्यक्तींच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करून गौरव करणे हे आजच्या काळाची गरज असून ही शिवाज्ञा आहे, …

Read More »