Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

स्त्रीभ्रूण हत्येबाबत समाजात जनजागृती व्हावी

संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल …

Read More »

तंत्रज्ञानामुळे नवीन शैली हद्दपार होण्याची भीती

विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील …

Read More »

औद्योगिक वसाहतीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र या

माजी अध्यक्ष शंतनु मानवी : एकत्रीत लढ्याची अपेक्षा निपाणी : येथील औद्योगिक वसाहतीबद्दल ऐकून वाचून मनाला अत्यंत कष्टदायक वेदना होत आहेत. प्रारंभापासून औद्योगिक वसाहतीचा विकास झाला. काही उद्योजकांनी प्लॉट घेऊन देखील उद्योगधंदे सुरू केल्या नव्हत्या. त्या प्लॉट आपण नवीन करून त्यावर 2016 डिसेंबर च्या पर्यंत 214 उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी …

Read More »

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण खबरदारी : मुख्यमंत्री बोम्माई

तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. …

Read More »

राज्यात लॉकडाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

बेंगळुरू : नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता …

Read More »

आरटीपीसीआर रिपोर्ट शिवाय कर्नाटकात प्रवेश नाही : डीवायएसपी मनोजकुमार नाईक

सीमा तपासणी नाका बंदोबस्त कडक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार्‍या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येणार आहे, अशी माहिती चिक्कोडी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी दिली. कोगनोळी …

Read More »

धामणे(एस) परिसरात हत्तींचा धुमाकूळ

बेळगाव : एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असताना आता धामणे (एस) परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी तिलारी परिसरातील धामणे(एस) व चंदगड तालुक्यातील काही गावात हत्तींचा उपद्रव होत असतो. गेल्या चार दिवसांपासून धामणे (एस) परिसरात तीन हत्तींचा वावर असून भात …

Read More »

अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचलीची निवडणुक जाहीर

राज्यातील 61 नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणुक बंगळूर : सध्या राज्यातील 25 विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्यातील 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 डिसेंबरला निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचली, एम. के. हुबळी आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही याच दिवशी होणार …

Read More »

दोन्ही सभागृहांमध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक चर्चेविना मंजूर

नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे परत करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. केंद्रीय …

Read More »

चिगुळे मराठी शाळेच्या इमारतीची दुर्दशा, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. चिगुळे मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात. मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ तीनच वर्गात सर्व …

Read More »