राज्यातील 61 नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणुक
बंगळूर : सध्या राज्यातील 25 विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्यातील 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 डिसेंबरला निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचली, एम. के. हुबळी आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही याच दिवशी होणार आहेत. कर्नाटक निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. 4 नगरपालिका, 19 नगरसभा, 35 नगरपंचायतींसाठी 27 डिसेंबरला मतदान होणार असून 30 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
चिक्कमंगळूर, शिरा, गदग-बेटगेरी, होसपेटे-हेब्बगोडी नगरपालिकांसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याचदिवशी 5 नगरपालिका, 3 नगरसभा आणि 1 नगरपंचायतीच्या रिक्त जागांसाठी मतदान होईल. विविध ग्रामपंचायतींच्या 386 रिक्त जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 8 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू होणार आहे. कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अथणी, अन्नीगेरी, बंकापूर, जिगनी, चंदापुर, बिडदी, मलेबेन्नूर, कापू, हरोगेरी, मुगळखोड, मुनवळ्ळी, उगारखुर्द, कारटगी, कुरेकुप्पा, कुरुगोडू, हगरीबोम्मनहळ्ळी, मस्की, कंभावी, कक्केरा नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
नायकनहट्टी, विट्ल, कोटेकारू, एम. के. हुबळी, कंकणवाडी, नागनुर, एक्संबा, कित्तूर, अरभावी, ऐनापुर, शेडबाळ, चिंचिली, बोरगाव, कल्लोळी, नलतवाड, निडगुंदी, देवरहिप्परगी, अलमेल, मुनगोळी, कोल्हार, कमतगी, बेळगली, अमिनगड, गुत्तल, जाली, तावरगेरा, कुक्कनुर, भाग्यनगर, कनकगिरी, मरियम्मनहळ्ळी, कविताळ, तुरविहाळ, बेळगानूर आणि सिरवार आदी नगरपंचायतींची निवडणुक होणार आहे.
निवडणुक कार्यक्रम : 8 डिसेंबर निवडणूकीची अधिसूचना, 15 डिसेंबर उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत, 16 डिसेंबर उमेदवारी अर्जांची छाननी, 18 डिसेंबर उमेदवारी माघारी, 27 डिसेंबर मतदान, 30 डिसेंबर मतमोजणी.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …