Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शहापूर म. ए. समितीही पंतप्रधानांना पाठवणार हजारो पत्रे

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त सीमाप्रश्नासाठी सीमाभागातून 11 हजार पत्रे पाठविण्याचा आंदोलन घेण्यात आले आहे. या आंदोलनाला शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत “एक पत्र सीमाप्रश्नासाठी” या उपक्रमाला शहापूर विभागातून हजारो पत्रे पाठविण्याचा व या उपक्रमांला …

Read More »

पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान

बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …

Read More »

निरंतर ज्योतिचा शुभारंभ लाभ बोगूर शेतकऱ्यांनी घ्यावा

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात निरंतर ज्योती योजना कार्यान्वित होऊन शेतकरी वर्गाला चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात २१८ खेड्यापैकी १६५ खेड्याना या निरंतर ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत खेड्यानाही निरंतर ज्योती योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील इटगी विभागातील बोगूर येथे निरंतर ज्योती योजनेंतर्गत शिवारतील ७० घराना निरंतर ज्योती …

Read More »

जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक संपन्न

बेळगाव (वार्ता) : भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ होते. प्रारंभी डॉ. व्ही. डी. डांगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे …

Read More »

चंदगडचे पोलीस नाईक विश्वजीत गाडवे बनले पोलीस उपनिरीक्षक…

कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : बाचणी (ता. करवीर) गावचे सुपुत्र व सध्याचे चंदगड पोलिस ठाण्याकडे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले विश्वजीत गाडवे हे खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक बनले. या निवडीबद्दल त्यांचा चंदगड पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 2011साली विश्वजीत गाडवे यांनी खात्यांतर्गत परीक्षा दिली होती. …

Read More »

अनधिकृत लाल-पिवळा स्वातंत्र्य दिनापूर्वी हटवा

बेळगाव युवा समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्यांना सिमावासीयांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पाठवणारबेळगाव (वार्ता) : राष्ट्रध्वजाच्या अपमाना संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांना समस्त सिमावासीयांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पाठवणार.संपूर्ण देशभरात एक देश एक तत्व असताना बेळगावात प्रादेशिक आयुक्त कार्यालय आवार, महानगरपालिका आणि इतर सरकारी ठिकाणी अनधिकृत लाल- …

Read More »

कर्नाटक एन्ट्रीसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह आवश्यक

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कर्नाटक सरकारने शनिवारी दुपारी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी शनिवारी दुपारपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमातपासणी …

Read More »

गुडबाय! बाबुल सुप्रियोंचा राजकारणातून संन्यास

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. एवढच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत, त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपाचे एक दिग्गज नेते होते. आता त्यांचा हा निर्णय भाजपासाठी …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

बेळगाव (वार्ता) : हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, …

Read More »

भाजप महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा खेळीमेळीत

खानापूर (वार्ता) : भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर जिल्हा आणि खानापूर महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. खानापूर येथील रवळनाथ मंदिरामध्ये काल शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूर भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रेमा भंडारी, खानापूर महिला मोर्चा अध्यक्ष …

Read More »