Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी खा. मंगला अंगडी

बेळगाव : बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जल मार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना या निवडीचे पत्र पाठवण्यात आले आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपली या पदी निवड करण्यात आली असून आपण वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आपल्या निवडीबद्दल बोलताना …

Read More »

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – आमदार अनिल बेनके

बेळगाव : पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी. बी. पाटील यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

खानापूर स्टेट बँकेबाबत ग्राहकातून नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या माहामारीत जनतेला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे. असे असताना खानापूर स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून बॅंक व्यवहारासाठी पास बुकावर बारकोडची सक्ती केल्याने अनेक ग्राहकांच्या पास बुकावर बारकोड नाही. अशाना स्टेट बँकेला दोन महिन्यापासून हेलपाटे मारावे लागत आहे.मात्र याची दखल स्टेट बँकेच्या व्यवस्थापकानी घेतली …

Read More »

१५ जुलैपर्यंत पुराची भीती नाही : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कोयना जलाशय परिसरात देखील कमी पाऊस पडल्यामुळे सध्या बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. कोरोना प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती संदर्भात चिकोडी तालुक्यात पाहणी दौरा केल्यानंतर आज बुधवारी सकाळी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ …

Read More »

बँक खात्याशी आधार, पॅन लिंक असेल तरच मिळणार जूनचा पगार!

बेळगाव : खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला असेल तरच त्यांना जून महिन्याचा पगार मिळणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला नसेल तर त्यांचा जून महिन्याचा पगार खात्यावर जमा …

Read More »

बेळगाव पासपोर्ट कार्यालय 28 पासून पुन्हा पूर्ववत सुरू

बेळगाव : कोरोनामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून बंद असलेले बेळगावातील पासपोर्ट सेवा केन्द्र (पीओपीएसके) आता राज्यात अनलॉक झाल्यामुळे सोमवार दि. 28 जूनपासून पुन्हा पूर्ववत सुरू केले जाणार आहे. राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंदच …

Read More »

दुर्गम भागात हेल्प फॉर निडीची मदत

खानापूर : बेळगावपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला धनगरवाडा या वाड्यात 22 ते 25 घरे आहेत. कोरोनामुळे या गावातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या कोरोना काळातही या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर यांनी धान्याचे वाटप केले होते आणि आताही या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटे, पोहे, रवा व धान्य …

Read More »

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव : शेतकरी, कामगार आणि गरिबांना दरमहा ५ हजार भरपाई द्यावी व अन्य मागण्यांसाठी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोती जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आ. अनिल बेनके यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले. लॉकडाउन संकटाच्या काळात राज्य सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांना पुरेशी …

Read More »

संतमीरा शाळेत वृक्षारोपण

बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर वनमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कॉलिंगण्णावर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, वीणाश्री तुक्कार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, गीता वर्पे …

Read More »

उद्या तिथीनुसार शिवप्रतिष्ठान साजरा करणार शिवराज्याभिषेक दिन सोहळा

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक 23 रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.कोरोना प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमावलीनुसार सामाजिक अंतर ठेवून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.प्रत्येक शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शिवाजी उद्या येथे सहभागी होता येणार नाही. यासाठी …

Read More »