Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पहिल्या बीडीसीए अखिल भारतीय 1800 खालील फिडे रेटेड क्लासिकल चेस टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन थाटात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना (बीडीसीए) आयोजित पहिल्या बीडीसीए अखिल भारतीय 1800 खालील फिडे रेटेड क्लासिकल चेस टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि कर्नाटक स्टेट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने ही बुद्धिबळ स्पर्धा शिवबसव नगर, बेळगाव येथील केपीटीसीएल समुदाय भवनात आयोजित करण्यात आली आहे. …

Read More »

लक्ष्मीकांत कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

  कन्येच्या वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थिनीला शैक्षणिक मदत बेळगाव : बेळगाव येथील लक्ष्मीकांत कांबळे यांनी मुलगी कृतिका हिचा पाचवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसासाठी करण्यात येणारा खर्च टाळून माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंडित नेहरू पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिची एक वर्षाची कॉलेज फी भरून सहकार्य केले. याबद्दल …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माजी महापौर निलिमा चव्हाण, दिपाली दीपक दळवी, कॉ. कृष्णा मेणसे तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, …

Read More »

सदाशिवनगर येथे शॉर्टसर्किटमुळे बेकरीला आग; ७५ लाखांचे नुकसान

  अग्निशमन दलाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बेकरी मालक नाराज बेळगाव : बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच सदाशिवनगर येथील विजय बेकरीमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. बेळगाव सदाशिवनगर सेकंड क्रॉसजनजीक असलेल्या विजय बेकरीत …

Read More »

“गोकुळ”च्या चेअरमनपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड

  कोल्हापूर : कोल्हापूर येथील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबतं चालू होती. नाविद यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यास यश मिळालं आहे. आज कोल्हापुरात …

Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

  पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत, त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होते, …

Read More »

बेळगावच्या कांदा मार्केटमध्ये भीषण आग; तीन दुकाने जळून खाक

  बेळगाव : आज सकाळी बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत आजूबाजूची तीन दुकानेही जळून खाक झाली. सुरुवातीला एका नॉव्हेल्टी दुकानाला आग लागली. नंतर एका प्लास्टिक आणि एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान …

Read More »

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या….

  बेळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना अनगोळ येथील दुर्गा कॉलनीमध्ये घडली असून पतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली “डेथ नोट” पोलिसांच्या हाती लागली आहे. सुनील मूलीमणी (३३) यांनी आपल्याच कम्प्युटर रिपेरी दुकानात वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण पत्नी असल्याचे “डेथ नोट”मध्ये नमूद …

Read More »

राज्य सरकारला मोठा धक्का; हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केले रद्द

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी २०२२ मध्ये जुन्या हुबळी येथील दंगलीसह ४३ गुन्हेगारी खटले मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश रद्द केला. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे. राज्य मंत्रिमंडळाने हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये, माजी मंत्री, …

Read More »

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; शहर म. ए. समितीचे आवाहन

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 1 जून 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन वाहण्याचा कार्यक्रम हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता होणार आहे. तरी अभिवादन कार्यक्रमास सीमाभागातील मराठी …

Read More »