Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावात अचानक वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू आज झाला. गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड रा. हिट्टणगी या दोघीही गावातील शेतातून चारा गोळा करून घरी परतत असताना वीज कोसळून जागीच मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का …

Read More »

जिद्द, चिकाटीने विद्यार्थी यशस्वी होतो : मनोहर बेळगावकर

  बेळगाव : शिक्षणातून माणूस घडत असतो. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. जिद्द ठेवा. अथक परिश्रम करून यशस्वी व्हा.पालक शिक्षक यांच्या कडून योग्य मार्गदर्शन मिळते. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नियमितपणे अभ्यास करा. मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करा. ध्येय निश्चित करुन पुढील अभ्यासक्रम निवडा. आवडीच्या क्षेत्रात कौशल्य वापरून विकास साधा. वेळेचे …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी बेळगाव शहर,बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता …

Read More »

“ऑपरेशन सिंदूर”च्या समर्थनार्थ राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची बेळगावात भव्य रॅली…

  बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारत पाकिस्तानला देत असलेल्या प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ बेळगावमध्ये आज राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांची शनिवारी भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सी.एम. त्यागराज म्हणाले की, केंद्र …

Read More »

बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कडेकोट बंदोबस्त : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  २-३ दिवसांत मॉक ड्रील बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असून, येत्या २-३ दिवसांत मॉक ड्रील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज दिली. आज देशातील युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस …

Read More »

भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी

  नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये …

Read More »

सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कराड साहित्य संमेलनात विशेष सन्मान

  कराड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक ९ व १० मे २०२५ रोजी कराड (जिल्हा सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन, टॉऊन हॉल या ठिकाणी अत्यंत प्रेरणादायी आणि साहित्यिक उर्जेने भरलेल्या वातावरणात पार पडले. या संमेलनात बेळगावचे प्रथितयश सीमाकवी रवींद्र …

Read More »

पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

  जम्मू काश्मीर : सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामध्ये राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत. यासह आणखी दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानने शनिवारी …

Read More »

ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या समर्थनार्थ बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसची ‘तिरंगा रॅली’

  बेंगळुरू : पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून भारतीय सैनिकांप्रती एकता आणि समर्थन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक काँग्रेसनेही ‘तिरंगा यात्रा’ काढून या भावनांना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमधील के.आर. सर्कल येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ‘देशभक्ती दर्शवूया, एकता …

Read More »

आता विराट कोहलीही घेणार कसोटीमधून निवृत्ती?

  मुंबई : रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने …

Read More »