बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावात अचानक वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू आज झाला.
गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड रा. हिट्टणगी या दोघीही गावातील शेतातून चारा गोळा करून घरी परतत असताना वीज कोसळून जागीच मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे.