Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा

  हिंदु जनजागृती समितीची मागणी १४४ वर्षांतून एकदा येणार्‍या महाकुंभमेळ्याला भारतातील ५० कोटींहून अधिक हिंदू भाविक आणि ५० हून अधिक देशांतील लाखो विदेशी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. आनंद अनुभवत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विचारवंत महाकुंभाच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची दखल घेतात. अशा वैश्विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे …

Read More »

सीमाप्रश्नी निपाणीत २५ ला धरणे; साहित्य संमेलनात ठरावाची मागणी

  निपाणी : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व जागृतीसाठी २५ फेब्रुवारीला येथील नरवीर तानाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार येथील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी घेतला. येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनात आज महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात …

Read More »

सेठ फाउंडेशनतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिकाने सन्मान

  बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या एसएसएलसी बोर्ड परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात आमदार सेठ यांनी दिलेल्या …

Read More »

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना

  म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः …

Read More »

विद्यार्थ्यांनी निर्भिडपणे परीक्षेला सामोरे जावे : मुख्याध्यापक पी. आर. पाटील

  बेळगाव : विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, यश नक्की मिळेल. त्यासाठी नियमितपणे सराव करा. चिंतन, मनन करून पूर्ण तयारीनिशी परीक्षेला जा म्हणजे यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी केले. मच्छे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल येथे …

Read More »

आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार

  मुंबई : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. पहिला सामना कोलकाता येथे केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात …

Read More »

नेताजी युवा संघटनेकडून नेताजी सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार

  येळ्ळूर : छत्रपती शिवाजी रोड येळ्ळूर येथील प्रगतशील नेताजी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी डी. जी. पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रघुनाथ मुरकुटे यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक म्हणून संजय मजूकर, प्रा. सी. एम. …

Read More »

जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे पूर्वपरीक्षा मार्गदर्शन

  बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे रविवार दिनांक 16.2.2025 रोजी बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन हायस्कूल मधील दहावीच्या मुलांकरता परीक्षेची पूर्वतयारी म्हणून मराठी व समाज या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. सरदार हायस्कूलचे शिक्षक माननीय श्री. रणजीत चौगुले तसेच बालवीर विद्यानिकेतनचे शिक्षक श्री. डी. डी. …

Read More »

बेळगाव महापालिकेतील आणखी दोन नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता

  नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पालिका कर्माचाऱ्याची लेखी तक्रारीची शक्यता बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दोन नगरसेवकांच्या विरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची शक्यता आहे. या तक्रारीची दखल घेत शहापूर पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांची चौकशी सुरू केली असल्याची शक्यता दबक्या …

Read More »

सदलग्यात उद्या छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण

  कामगार मंत्री संतोष लाड यांची उपस्थिती सदलगा : सदलगा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे. याच दिवशी सकाळी समस्त हिंदू महिलांकडून झांजपथकाच्या दणदणाटात अंबिलकलश, जलकलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी होमहवनादी कार्यक्रम …

Read More »