कामगार मंत्री संतोष लाड यांची उपस्थिती
सदलगा : सदलगा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे. याच दिवशी सकाळी समस्त हिंदू महिलांकडून झांजपथकाच्या दणदणाटात अंबिलकलश, जलकलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी होमहवनादी कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी अनावरण सोहळ्यास येणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी दुपारी १ ते २.३० दरम्यान कुंद कुंद कन्नड माध्यम शाळेच्या प्रांगणात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांनी स्वतः २५ लाख रुपये खर्चून त्यांच्या अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनतर्फे छ. शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती चौकातील नियोजीत जागेवर आणून ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी ४ वाजता होत असलेल्या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आहेत. या पुतळ्याचे आनावरण सोहळ्यास कर्नाटक राज्य कामगार मंत्री संतोष लाड, आमदार सतेज पाटील, के एल ई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, महांतेश कवटगीमठ, बेळगांव जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी, चिकोडी लोकसभा खासदार प्रियांका जारकीहोळी, वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, उत्तम पाटील (बोरगांव), दादा राजे निंबाळकर (निपाणी), माधवराव घाटगे, स्वरूप महाडीक, अजितसिंग निंबाळकर, गीताश्रम मठाचे श्रद्धानंद स्वामीजी या मान्यवरांच्या आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यास परिसरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सदलग्यातील नागरीक, सकल मराठा समाज व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांनी केले आहे.
या सोहळ्यास येणाऱ्या वाहनधारकांसाठी, हालप्पन्नवर प्लॉट, मल्लिकार्जुन कल्याण मंटप, महालिंगस्वामी शाळा, उर्दू हायस्कूल, कुवेंपु मादरी शाळा आदी ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे.
या अनावरण सोहळ्याच्या नियोजन बैठकीत मोहन शितोळे, गजानन पाटील, अनिल माने, कुमार माने, बाळासाहेब पाटील (मलिकवाड), रमेश माने, प्रदीप जाधव (मांगूर), प्रा. प्रकाश कदम (कोगनोळी), ॲड. बी.आर. यादव (चिकोडी), संतोष हवालदार, परशूराम साळुंखे, आनंद मोरे, किशोर पवार (काडापूर), जयदीप मयेकर, शुभम साळुंखे, अनिरुद्ध पाटील, शिरीष अडके, राजू अमृतसम्मान्नावर आदी उपस्थित होते.