Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

गाझातील शाळेवर बॉम्बहल्ला; 30 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश

  गाझा शहरात इस्राइलचा नरसंहार अद्याप सुरूच आहे. जगभरातून टीका होत असूनही, नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर त्यांचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत. …

Read More »

उत्तराखंडमध्ये 22 ट्रेकर्स खराब वातावरणात अडकले, 9 जणांचा मृत्यू

  डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या 22 जणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे खराब वातावरणात रस्ता चुकल्यामुळे 9 ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १३ ट्रेकर्सचा शोध चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत ट्रेकर्समध्ये पुण्यातील एका तरुणाचा समावेश आहे. तर उर्वरित ट्रेकर्स हे कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील आहेत. उर्वरित ट्रेकर्सचा …

Read More »

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने ‘श्रीगणेशा’, आयर्लंडचा 8 गड्यांनी पराभव

  न्यूयॉर्क : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा भारताने विजयी प्रारंभ केला. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 8 गडी राखून आणि 48 चेेंडू शिल्लक ठेवून मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज चमकले. अर्शदीप सिंगने आयर्लंडला सुरुवातीला धक्के दिले. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा करून आयर्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. …

Read More »

लाख मोलाची मते हजारांवर…

  (१) कालच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता समिती उमेदवाराला पडलेली मते ही चिंताजनक आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक निवडणुका लढविल्या पण यावेळी समिती उमेदवाराला पडलेली मते पाहता चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुका लढवते तो लढ्याचा एक भाग म्हणून. समितीच्या राजकारणाला एक वैभवशाली इतिहास आहे. एक काळ असा …

Read More »

नरेंद्र मोदीच पंतप्रधान; मोदींना २१ पक्षांचे समर्थन पत्र

  नवी दिल्ली : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्म यांची भेट घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला. काळजीवाहू पंतप्रधान मोदींनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी २१ पक्षांनी समर्थन पत्र दिले आहे.

Read More »

नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ठेवल्या चार मोठ्या मागण्या

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी भाजप बहुमतापासून थोडक्यात हुकली आहे. या निकालानंतर नितीश कुमार हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. यातच नितीश कुमार हे बिहारच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी …

Read More »

नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि 17वी लोकसभा विसर्जित करावी, असे पत्र सादर केले. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची …

Read More »

सरकारच्या जबाबदारीतून मला मोकळ करावे; देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडायचे असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा आल्या. राज्यातील पराभवाची जबाबादारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र …

Read More »

विमल फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

  बेळगाव : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजप नेते आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी परिसरात वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला. जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून ते जगावावे. पर्यावरण ढासळत चालले असून समतोल राखण्यासाठी संघ-संस्थानी किमान आपापल्या भागात झाडे लावावीत आणि …

Read More »

वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीला बोलावून मित्राचा खून

  बेळगाव : वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील नुगानट्टी गावामध्ये घडली आहे. सदर घटना मंगळवारी घडली असून या खूनाचा उलगडा बुधवारी सकाळी झाला. मृत युवकाचे नाव बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दण्णवर (वय 23) असे आहे. वैयक्तिक भांडणांमधून हे कारस्थान करण्यात आल्याची माहिती देण्यात …

Read More »