नवी दिल्ली : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्म यांची भेट घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला. काळजीवाहू पंतप्रधान मोदींनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी २१ पक्षांनी समर्थन पत्र दिले आहे.