Friday , November 6 2026
Breaking News

नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा

Spread the love

 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि 17वी लोकसभा विसर्जित करावी, असे पत्र सादर केले.

या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. या संदर्भात आज राष्ट्रपती भवनात गेलेल्या मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहनाचे पत्र सादर केले. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *