Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेलच ओतले; मच्छे येथील घटना

  मच्छे (ता. बेळगाव) : सतत सुरु असलेल्या घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना रामनगर (मच्छे) येथे सोमवारी घडली आहे. या घटनेत पती सुभाष पाटील (वय 55) हे गंभीर भाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी वैशाली पाटील स्वयंपाक करत असताना किरकोळ …

Read More »

जनगणनेसंदर्भात हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने जनजागृती

  बेळगाव : कर्नाटक सरकारने सुरू केलेले सामाजिक व शैक्षणिक जनगणतेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे हलगा गावातील कोणत्याही नागरिकाची जनगणती चुकू नये यासाठी हालगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन विचारपूस करण्याचे अभियान हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा शुभारंभ मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी कार्यकर्तीच्या खून प्रकरणी टेम्पो चालकाला अटक

रामनगर : नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी कार्यकर्ती अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना …

Read More »

मालमत्ता करवाढ रद्द करा अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा काकती ग्रामपंचायत सदस्यांचा इशारा

  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : काकती ग्रामपंचायतीतील सदस्यांनी असंविधानिक पद्धतीने वाढवलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली असून, करवाढ मागे घेतली नाही तर सर्व सदस्य सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. काकती हे गाव …

Read More »

बेळगावच्या नवोदित कवींनी सजवले पुणे संमेलन!

  पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथे पार पडलेल्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील कवी-कवयित्रींनी आपल्या प्रभावी काव्यरचनांनी रसिकांची मने जिंकली. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि सीमाभूमीच्या अभिमानाचा गौरव या काव्य सत्रात अनुभवायला मिळाला. या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील …

Read More »

सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मागितला जात प्रमाणपत्राचा पुरावा!

  बेळगाव : सध्या कर्नाटक जिल्ह्यात जनगणना सुरू आहे ही जनगणना सुरू झाल्यापासून प्रशासनाचा गलथान कारभार समोर येत आहे. प्रशासनाने पहिल्यांदाच जनगणना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे राबविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तांत्रिक त्रुटीमुळे ही जनगणना करताना संबंधित अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जनगणना सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित …

Read More »

बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजप ५० टक्केही जागा जिंकणार नाही

  बेळगाव : बेळगावमध्ये काँग्रेसच्या वतीने ‘मत चोरी’ प्रकरणी सही संकलन अभियानाचा आज एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसीफ सेठ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन म्हणाले की, “बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घेतल्यास भाजपला ५० टक्केही जागा जिंकता येणार नाहीत.”“मत …

Read More »

काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केल्याचा आरोपातून समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : 2016 साली एक नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर महाराष्ट्राच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केल्याचा आरोप समिती कार्यकर्ते केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर यांच्याविरुद्ध बेळगाव येथील जेएमएफसी तिसऱ्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुन्हा सिद्ध न झाल्याने तब्बल नऊ वर्षानंतर त्या तिघांची निर्दोष …

Read More »

खडक गल्लीतील दगडफेकीच्या खऱ्या दोषींवर कारवाई करा

  बेळगाव : बेळगावच्या खडक गल्ली परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून हिंदू-मुस्लीम सलोखा कायम राखला जावा, या मागणीसाठी खडक गल्लीतील नागरिकांनी आज शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत खडक गल्लीतील नागरिकांनी ही …

Read More »

संजीवीनी फाउंडेशन आयोजित उमंग – २०२५ मध्ये उद्या गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान…

  ‘सर्वगुण संपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.’ सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री. दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली. म्हणतात ना…”शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.” तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य …

Read More »