Sunday , September 20 2026
Breaking News

नंदगड येथील अंगणवाडी कार्यकर्तीच्या खून प्रकरणी टेम्पो चालकाला अटक

Spread the love

रामनगर : नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी कार्यकर्ती अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना कक्केरी येथे जत्रेला नेले होते. जत्रा आटोपल्यानंतर परतताना त्याने त्यांना “बीडी येथे सोडले” असा दावा पोलिसांसमोर केला होता. त्यावेळी नंदगड पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले होते. मात्र, काही दिवसांनी अश्विनी पाटील यांचा मृतदेह तीनईघाट येथील पुलाखालील पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेनंतर शंकर पाटील फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी रामनगर पोलिसांनी विशेष पथक तयार करून मोहीम सुरू केली. अखेर केवळ 24 तासांच्या आत पोलिसांनी त्याला नंदगड येथे जेरबंद केले.

अश्विनी पाटील यांच्या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शंकर पाटीलच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या तो रामनगर पोलिसांच्या कस्टडीत असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *