Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सहकाररत्न उत्तम पाटील चषक कागलच्या डेंजर बॉईज क्लबकडे

  निपाणी संघ उपविजेता निपाणी (वार्ता) : येथील गोसावी व मकवाने यांच्यावतीने कै. विश्वासराव शिंदेनगर येथील तिरंगा स्पोर्ट्स क्लबतर्फे आंदोलननगर आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात निपाणी ज्युनिअर स्पोर्ट्स क्लब व डेंजर बॉईज- कागल यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. निपाणी जूनियर स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करीत ४९ धावा जमवल्या तर कागलच्या डेंजर …

Read More »

निपाणीत नव्या तलाव निर्मितीची योजना

  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर : निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : शहराच्या लकडी पुलापासून सुमारे १०० एकर जागेत नव्या तलाव निर्मितीचा प्रस्ताव आहे. यासाठी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

चैत्यभूमी ही मानवी मूल्यांची क्रांती भूमी आहे : प्रबोधनकार मिथुन मधाळे

  निपाणी : दादरच्या चैत्यभूमीवरील जनसमुदाय पाहता मानवी जीवन मूल्याची प्रेरणा मिळण्याची स्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी होय, असे प्रतिपादन आडी येथील तक्षशील बुद्ध विहारांमध्ये आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानात मिथुन मधाळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रत्नाप्पा वराळे …

Read More »

शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि जिंकणार : दीपक दळवी

  दळवी यांच्या जन्मदिनी युवा कार्यकर्त्यांनी घेतली भेट, दिल्या शुभेच्छा आणि घेतले आशीर्वाद बेळगाव : दि. ७ डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांचा ८२ वा वाढदिवस, याचे औचित्य साधून समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या तसेच आशीर्वादही घेतले, गेल्या वर्षभरापासून दळवी …

Read More »

उसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळालाच पाहिजे

  राजू पोवार : विधानसभेला घरावर घालण्यासाठी मोर्चा रवाना निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला कारखाने आणि सरकारने प्रतिटन ५५०० रुपये दिले पाहिजेत. याशिवाय यापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गतवर्षीच्या ऊसाला १५० रुपये प्रतिटन दिले पाहिजे. शिवाय महापूर आणि अतिवृष्टी काळात झालेल्या पिकांचा निपक्षपतीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी …

Read More »

सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी; आर.अशोक यांची विधानसभेत मागणी

  बेळगाव : नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी, आर्थिक परिस्थिती संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी विधानसभेत बोलताना दिला. दुष्काळी परिस्थिती संदर्भात आज विधानसभेत झालेल्या चर्चेप्रसंगी पुढे बोलताना आर. अशोक म्हणाले, पावसा अभावी राज्यात …

Read More »

संवाद लेखन स्पर्धेचा निकाल १० रोजी

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) …

Read More »

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

  बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय बालिका आणि 26 वर्षीय तरुण जिवंत जळले तर दोघे गंभीर जखमी झाले. काल बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास कंग्राळी गावातील नातेवाईकांचे लग्न आटोपून बंबरगा गावात जात असताना केदनूर गावातून भूतरामहट्टी गावाकडे माती वाहून …

Read More »

बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वन विभागाचा अडथळा; मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती

  बेळगाव : गर्द अरण्य विभागात असलेल्या खानापूर खानापूर तालुक्यात विकासाची कामे राबवताना अनेक वेळा वनविभागाचे नियम अडथळे ठरत आहेत असे असतानाही सरकारने या तालुक्याचा सर्वांगीण विकास चालविला आहे मात्र त्यामध्येही प्रामुख्याने राखीव वनक्षेत्रात रस्त्याची कामे हाती घेताना वनविभागाचे नियम अडथळे ठरत असतात, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर

  नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीओके हे आमचेच आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ …

Read More »