बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) अशा दोन गटात पार पडली. दोन्ही गटात मिळून एकूण ९२ स्पर्धकांनी यात भाग घेतला. या स्पर्धेचा निकाल व बक्षिस वितरण समारंभ १० डिसेंबर २०२३ रोजी लोकमान्य ग्रंथालय, अनगोळ रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावातील ज्येष्ठ लेखिका आणि नाट्य दिग्दर्शिका सौ. मेधा मराठे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या संवादांचे वाचन विद्यार्थी करणार आहेत तरी कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोत्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. पुष्कर ओगले यांनी केले आहे.