Monday , June 8 2026
Breaking News

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय बालिका आणि 26 वर्षीय तरुण जिवंत जळले तर दोघे गंभीर जखमी झाले.
काल बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास कंग्राळी गावातील नातेवाईकांचे लग्न आटोपून बंबरगा गावात जात असताना केदनूर गावातून भूतरामहट्टी गावाकडे माती वाहून नेणाऱ्या टिप्पर व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी वाहने एकमेकांवर आदळल्याने डिझेलची टाकी फुटून कार व टिप्परने पेट घेतला. आणि कारमधील दोघे जिवंत जाळले तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेळगाव येथील बंबरगा गावातील 26 वर्षीय मोहन मारुती बेळगावकर आणि मच्छे गावातील 11 वर्षीय समिक्षा सागर डेलेकर यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाला. एकाच गाडीतून प्रवास करणारे महेश बेळगावकर आणि स्नेहा बेळगावकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
अपघातानंतर टिप्पर चालक तात्काळ पळून गेला. काकती पीएसआय मंजुनाथ हळकुंद व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून काकती पोलीस तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लक्ष्मी हेब्बाळकर यांना पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी : व्यंकट पाटील

Spread the love  बेळगाव : कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्याच्या पहिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *